मी मराठी?

इंग्रजी वर प्रेम तर लहानपणी पासुन च होतं।
काय करणार, नसुन चालणार ही नव्हतं।

शाळा इंग्लिश, माध्यम इंग्लिश।
आणि म्हणूनच, आम्हीही इंग्लिश।

खेळ खेळलो ते पण इंग्लिश।
पुस्तके वाचली ती सुद्धा इंग्लिश।

पण हा नाद उंबरठ्या बाहेर च राहायचा।
आत पाय पडताच तो आंगावरुन झटकायचा।

घरात आम्ही नेहमीच मराठी असायचो।
बोलुनं ही आणि वागुनं ही।

मातृभाषा असल्यामुळे ती स्वताहुन च आली।
आणि म्हणूनच तीची कधी कदर नाही केली।

फुक्टात मिळालेल्या वस्तु ची किंमत नव्हती।
पण है सांगण्याची आपली हिम्मत ही नव्हती।

नुसतं "गर्व आहे!" असे म्हणुन कही होत नाही।
ते स्वतः स्वीकारणे तेव्हढेच गरजे चे असते।

बोला, वागां आणि गर्व ही करा।
पण एक नेहमी लक्षात ठेवा।

मी मराठी असलो तर असेन।
पण त्या आधी मी एक भारतीय नक्कीच आहे।

Bạn đang đọc truyện trên: AzTruyen.Top