ती, एक झुळुक

पांढर्या शुभ्र कागदावर,
ती आहे रंगांची झुळुक
दगड झालेल्या हृदयावर,
ती आहे भावनांची झुळुक

वाऱ्या सोबत वाहत येते,
शांत अंधारात चालत येते
कोंडालेल्या त्या मनावर,
ती आहे शब्दांची झुलुक

अश्रुंनी माखलेल्या डोळ्यांमधे,
ती आहे ओलाव्याची झुलुक
व्यथित झालेल्या चेहऱ्यावर,
ती आहे हास्यचि झुळुक

कुठून येते माहीत नाही,
का येते माहीत नाही
पण जादुगराला मोहात पाडनारि,
ती आहे प्रेमाची झुळुक

हवी-हाविशी वाटनारी,
स्वताःच्या पावसात भिजवनारी
लेखकाला प्रेरित करणारी,
ती, एक झुळुक

***

Dedicated to mru1202

Thank you for inspiring me and making me write one more marathi poem.

Bạn đang đọc truyện trên: AzTruyen.Top